आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
The wait is over and it's time to tussle! 💙💛
Who do you think will find the 𝐖 in the toughest rivalry? 👀
Tune-in to #INDvAUS in #WorldCupOnStar
TODAY, 12:30 PM onwards | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/iYlsSyBsWN
— Star Sports (@StarSportsIndia) October 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)