लखनौच्या एकना स्टेडियमवर गुरुवारी (12 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) संघ आमनेसामने आहे. पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)