टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज राजकोटमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाकडे तिसरी वनडे जिंकून क्लीन स्वीप पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही तिसऱ्या वनडेत परतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वार्नर 56, मार्श 96, स्मिथ 74 आणि मार्नस लॅबुशेनने 72 अश्या दमदार धावा केल्या. तसेत भारताकडून बुमराने 3 विकेट घेतल्या.
Australia in first 30 overs - 230/2
Australia in last 20 overs - 122/5
India needs 353 runs to white-wash Australia for the first time in ODIs. pic.twitter.com/ADAYtmYa95
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)