ICC T20 विश्वचषक 2021 च्या गट 1 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) बांगलादेशविरुद्ध  (Bangladesh) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात अ‍ॅडम झाम्पाच्या (Adam Zampa) पाच विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने घातक गोलंदाजी करून बांगलादेश संघाचा डाव केवळ 73 धावांवर संपुष्टात आणला. झाम्पाने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करून चार षटकांत केवळ 19 धावा दिल्या. बांगलादेशकडून शमीम हुसेनने सर्वाधिक 19 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)