भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. हा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळला गेला, परंतु सततच्या पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही आणि भारताला या सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघानेही सुवर्णपदकावर कब्जा केला होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आयसीसी टी-20 क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)