Teams Qualified for T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup 2024) साठी सर्व 20 संघ निश्चित झाले आहेत. युगांडाच्या संघाने वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 पात्रता फेरीसाठी पात्र ठरणारा 20 वा संघ बनून इतिहास रचला आहे. तर नामिबिया हा आफ्रिका विभागातील दुसरा संघ पात्र ठरला आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वे संघासाठी आणखी एका दु:खाच्या क्षणी, ते सलग दुस-यांदा विश्वचषकात स्थान गमावले आहेत. हा संघ एकदिवसीय विश्वचषक तसेच पात्रता फेरीला मुकला. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर, आपल्या कामगिरीने करु शकतात कहर)

T20 World Cup 2024 साठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ:

वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

पाहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)