Virat Kohli Reaction after Akashdeep Hitting Six: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. त्यानंतर आकाशदीपने अप्रतिम षटकार ठोकला, त्यानंतर विराट कोहली आनंदाने उड्या मारू लागला, त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे विराट कोहली इतका आनंदी दिसत होता की त्याच्या तोंडून अपशब्दही निघाला.
आकाश दीपच्या षटकाराला विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल
Kohli reaction after Akashdeep hitting Six 😂🔥🫡#INDvsAUS #viral #ViratKohli𓃵 #Bumrah #akashdeep #RohitSharma𓃵 pic.twitter.com/XklWjkW9eh
— vk18 (@king19mahadev) December 17, 2024
Virat Kohli's reaction on akashdeep Saving Follow-on for team india, and the after hitting six.😂🤍🔥#INDvsAUS pic.twitter.com/RLK598FZEB
— Utkarsh (@toxify_x18) December 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)