14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या रोमांचक सामन्याबद्दल भारतातील क्रिकेट चाहते उत्सुक असतानाच काही चाहत्यांनी सोशल मीडियावर भारत-पाक (IND vs PAK) सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी (#BoycottIndoPakMatch) ही मोहीम राबवली गेली आहे. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कथित पाकिस्तानशी संबंध असल्याच्या कारणावरून भारत-पाक सामन्याचा हा निषेध करण्यात येत आहे. तसेच पाकिस्तान संघाचे भारतात जोरदार स्वागत झाल्यामुले चाहते बीसीसीआयवरही नाराज आहे. दरम्यान, बीसीसीआयने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक सामन्यापूर्वी एका संगीत कार्यक्रमाची योजना आखली आहे, ज्यामध्ये शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि अरिजित सिंग यांसारखे बॉलिवूड स्टार सादर करतील अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या या पावलावर अनेक चाहते संतापले आहेत. विशेषत: जेव्हा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा केला गेला नव्हता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)