टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा 33 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दाखल होणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा उपांत्य फेरीच्या तिकिटावर असतील. जर टीम इंडिया हा सामना जिंकला तर सेमीफायनलमध्ये पोहोचेल. त्याचवेळी श्रीलंकेचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात सहा सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली आणि स्टार फलंदाज विराट कोहलीनंतर सलामीवीर शुभमन गिलनेही अवघ्या 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाचा स्कोर 122/1 आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli Record: विराट कोहलीचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकुन एका कॅलेंडर वर्षात केल्या एक हजारहून अधिक धावा)
Second FIFTY of #CWC23 for Shubman Gill!
His 11th half-century in ODIs 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/rKxnidWn0v#TeamIndia | #MenInBlue | #INDvSL pic.twitter.com/LfCnsQhyUl
— BCCI (@BCCI) November 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)