Rohit Sharma Has Intense Chat With Hardik Pandya: रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कडून 6 धावांनी पराभव झाला. या सामन्याने मुंबईसाठी एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या संघाचे नेतृत्व केले. मात्र, मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्यासोबत गंभीर चर्चा करताना दिसला. यावेळी फ्रँचायझीचे मालक आकाश अंबानी देखील त्यांच्या शेजारी उभे होते. सामन्यादरम्यान, रोहित काही धोरणात्मक निर्णयांचा भाग म्हणून हार्दिक आणि इतर खेळाडूंशी बोलताना दिसले. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये हार्दिक मागून रोहितला मिठी मारताना दिसत आहे. पण, माजी MI कर्णधार मागे वळून निराश दिसला.

व्हिडिओ पहा - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)