आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला मात करण्याचे आव्हान असेल. तर बांगलादेशकडून पराभव होवुन अफगाणिस्तान दुसऱ्या सामन्यात पहिल्या विजयाच्या शोधात असतील. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर अफगाणिस्तानचे कर्णधार हशमतुल्ला शाहिदीकडे आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 33/1
Edged & taken! @Jaspritbumrah93 with the strike as @klrahul takes the catch! 🙌
First success with the ball for #TeamIndia! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/f29c30au8u #CWC23 | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/GowXTI9oKY
— BCCI (@BCCI) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)