इब्राहिम झद्रानच्या शतकामुळे अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य दिले आहे.इब्राहिम झद्रान व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाजांनी चांगला खेळ केला आहे, ज्यामध्ये रहमत शाह (30) आणि राशिद खान (35) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. आयसीसी विश्वचषक २०२३ चा ३९ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 1, जोश हेझलवूडने 2, ग्लेन मॅक्सवेलने 1, अॅडम झाम्पाने 1 बळी घेतला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)