आयपीएल 2023 चा (IPL 2023) पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात पाहायला मिळत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण याआधी दोन्ही खेळाडूमध्ये खास बाॅंड पाहायला मिळाला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Can't get enough of this Bromance 🫶
Dhoni & Papa Pandya are all smiles before the big game tonight but who will have the last laugh? 👀
Watch the Qualifier action unfold 👉 LIVE & FREE on #JioCinema 🎬#GTvCSK #IPLonJioCinema pic.twitter.com/OQ9O6qEoEC
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)