IND vs SL 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. या अटीतटीच्या सामन्यात हा सामना बरोबरीत सुटला आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 230 धावा केल्या. श्रीलंकेसाठी स्टार अष्टपैलू ड्युनिथ वेलालेजने नाबाद 66 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ 47.5 षटकांत केवळ 230 धावा करून अपयशी ठरला. टीम इंडियासाठी सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून चारिथ असलंका आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना रविवारी दुपारी 2.30 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे.
A thrilling start to the #SLvIND ODI series.
The First ODI ends in a tie.
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzggf#TeamIndia pic.twitter.com/ILQvB1FDyk
— BCCI (@BCCI) August 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)