AUS vs PAK 2nd Test: डेव्हिड वॉर्नर गुरुवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) च्या ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मीर हमजाने उपाहारानंतर 5व्या षटकात वॉर्नरला बाद केले. या डावखुऱ्या फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात केवळ सहा धावा करता आल्या. असे असतानाही स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. केवळ प्रेक्षकच नाही तर वॉर्नरचे सहकारी खेळाडूही टाळ्या वाजवत होते. जेव्हा वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा एका छोट्या चाहत्याने हातात एक चार्ट धरला होता, ज्यावर लिहिले होते - डेव्ही वॉर्नर, 31, अनेक आठवणींसाठी धन्यवाद! मला तुमचे हातमोजे मिळतील का? हे पाहताच वॉर्नरने आपले दोन्ही हातमोजे चाहत्यांच्या हाती दिले, जे त्यांना मिळाल्याने खूप आनंद झाला.
पाहा व्हिडिओ
At the ground where he scored 912 Test runs, and made his T20I debut all those years, David Warner bids farewell to the MCG for one final time #AUSvPAK pic.twitter.com/0XQ6O74meH
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)