ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका सुरू होणार आहे. अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 जूनपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ एजबॅस्टनच्या मैदानावर आमनेसामने असतील. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने जोश टंगला आपल्या संघात संधी दिली आहे. जोश टंग कौंटी क्रिकेटमध्ये वूस्टरशायरकडून खेळतो.
पहिल्या दोन कसोटींसाठी इंग्लंडचा ऍशेस संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट , जोश टोंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
पाहा ट्विट -
England's Ashes squad for the first two Tests:
Stokes (C), Crawley, Root, Anderson, Broad, Robinson, Duckett, Bairstow, Tongu, Leach, Woakes, Brook, Pope, Wood and Potts. pic.twitter.com/xuNeO5ZisV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)