भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 अशा पराभवानंतर आता कोहलीनेही कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासह कोहली आता तिन्ही फॉरमॅटमधील भारतीय संघाच्या कर्णधारपदापासून दूर गेला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत पहिल्या क्रमांकाची खुर्ची गाठली. मात्र आता कर्णधारपदाची कामगिरी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात के एल राहूल किंवा रिषभ पंत या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
#KLRahul Or #Rishabpant can be test captain#BCCI #ViratKohli
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) January 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)