Worms Rain in China: चीनची राजधानी बीजिंगमध्ये विचित्र पाऊस पडत आहे. येथे आकाशातून किडे पडत आहेत. आकाशातून पडणाऱ्या किड्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या किड्यांनी पूर्णपणे झाकल्या गेल्याचे दिसत आहे, तर रस्त्यावर किटकांचे थवेही दिसत आहेत. लोकांना छत्री घेऊन घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विचित्र घटनेमागील कारणही समोर आलेले नाही. आता त्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
WATCH 🚨 China citizens told to find shelter after it looked like it started to rain worms pic.twitter.com/otVkuYDwlK
— Insider Paper (@TheInsiderPaper) March 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)