सोन्याच्या दुकानातून बुरखाधारी चार महिलांनी सोन्याचा एक ट्रे लंपास केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रायसेन येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ते चोरट्यांना पकडण्यासाठी इतर ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एका सोन्याच्या दुकानात बुरखा घालून चार महिला घुसल्या. त्यांनी संधी साधून दुकानदाराची नजर टाळून सोन्याच्या दागिन्यांचा ट्रे काढून घेतला आणि पोबारा केला. काही वेळातच दुकानदाराच्या लक्षात येते की दागिन्यांचा ट्रे गहाळ आहे. त्यानंतर त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि घटनेचा उलघडा झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चार आरोपींची ओळख पटवण्यासाठी ते जवळपासच्या दुकानांचे आणि रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. (हेही वाचा, Viral Video: सिगारेट न दिल्यामुळे माथेफिरू महिलेने पेट्रोल पंप दिला पेटवून, पुढे जे झाले ते पाहून व्हाल थक्क)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)