रस्त्यावर अनेक अपघात होतात. यामध्ये अगदी कुत्र्यांपासून ते अनेक मोठ मोठे प्राणी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे बळी ठरतात. परंतु केरळमधील कोची येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे. याठिकाणी सीपोर्ट-एयरपोर्ट रोड कक्कनड सिग्नलजवळ रस्त्यावर विशालकाय अजगर दिसून आला. हा अजगर रस्ता ओलांडत होता. त्याला पाहून काही चालकांनी आपली गाडी थांबवलीच, यासह अजगराला आरामात रस्ता ओलांडता यावा म्हणून त्यांनी इतर वाहनेही थांबवली गेली. थोडक्यात, या अजगराने ट्राफिक जाम केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)