Tiger 3 Movie: दिवाळी निमित्त सलमान खानचा टायगर ३ चित्रपट रिलीज झाला होता. चाहत्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुकता दाखवली. दरम्यान एका चित्रपटगृहात चाहत्यांनी फटाके फोडल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर थिएटरमध्ये बराच वेळ गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थिएटरमध्ये फटाके फोडल्यानंतर बराच वेळ प्रेक्षकांचा तारांबळ उडाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)