Nagpur: नागपुरात नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेने लोकांना धक्का बसला आहे. ओव्हरटेक केल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना भरचौकात घडली असू या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष आक्रमकपणे महिलेला मारहाण करताना दिसत आहे. या व्यक्तीने महिलेचा डोके पकडून ते गाडीच्या पृष्ठभागावरही आपटण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचे केसही ओढले. हा सर्व प्रकार घडत असताना तेथील लोकांना या व्यक्तीला रोखले मात्र, ही व्यक्ती तरीदेखील महिलेला मारहाण करत होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)