Spanish Fighter Jet Crash: शनिवारी स्पॅनिश F-18 लढाऊ विमान प्रदर्शनादरम्यान झारागोझा हवाई तळावर क्रॅश झाले. वृत्तानुसार, हे जेट स्पॅनिश हवाई दलाचे आहे. विमानाला धडकण्यापूर्वीच पायलटला बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत, जवळपासच्या नागरिक आणि निरीक्षकांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्पॅनिश हवाई दलाचे F-18 हॉर्नेट फायटर जेट आज सकाळी Spain मधील झारागोझा एअर बेसमध्ये क्रॅश झाले. पायलट बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि अपघाताची कारणे सध्या अज्ञात असल्याचं एका एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं आहे. (हेही वाचा -Uttar Pradesh: एटामध्ये रोडवेज बसने दुचाकीस्वाराला चिरडले; 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेली बाईक, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)