Snake Found in Police Station: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मधुबन बापुधाम पोलीस ठाण्यात त्यावेळी गोंधळ उडाला होता. जेव्हा पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एक मोठा कोब्रा साप बसलेला आढळून आला. ही माहिती तातडीने वनविभागाच्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याची सुटका केली. बचावानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. त्यावेळी लॉकअपमध्ये कैदी नव्हते हे सुदैवाने म्हणावे लागेल. अन्यथा कोब्रा साप त्यांना दंश करू शकला असता. त्यामुळे कैद्यांसह पोलिसांच्याही अडचणी वाढल्या असत्या.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)