भारतीय पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. अपवादात्मक नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण पोलीसिंग तंत्रासाठी ते ओळखले जातात. कडक शिस्तीचे दिसणारे विश्वास नांगरे पाटील हे प्रत्यक्षात अतिशय मनमिळावू असल्याचे अनेक व्हिडिओजमधून आपण पाहिले आहेत. विश्वास नांगरे पाटील हे सोशल मिडियावर सक्रीय असून वेळोवेळी अनेक साहसी गोष्टी करताना दिसले आहेत. आताही त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते पहिल्यांदा स्काय डायव्हिंग करताना दिसत आहेत. 2.43 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा संपूर्ण स्काय डायव्हिंगचा थरारक अनुभव शेअर केला आहे.

ते म्हणतात, ‘स्काय डायव्हिंग करणे हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होते आणि आता स्पेनमधील सेव्हिल एअरफील्डवर विमानातून 15,000 फूट उंचीवरून उडी मारण्याचा अनुभव मी घेतला. विलक्षण मानसिक आणि शारीरिक अनुभूती देणारा हा अनुभव होता. जिंदगी ना मिलेगी दोबारा, आयुष्यभराचा अनुभव.’ (हेही वाचा: Rahul Gandhi Sewa Video: अमृतसर च्या गोल्डन टेंपल मध्ये राहुल गांधी यांची चप्पल स्टॅन्ड वर 'सेवा'; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)