Ram Mandir Song In Delhi Metro: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी रामलल्लाचा अभिषेक करणार आहेत. केवळ धार्मिक नगरी अयोध्याच नाही तर संपूर्ण देश या शुभ सोहळ्याची तयारी करत आहे, जसजसे अयोध्येमधील राम मंदिर उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे, तसतसे लोकांमधील उत्साहदेखील वाढत आहे. आता दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये काही मुले गिटारवर राम मंदिराच्या उभारणीबाबतचे गाणे म्हणत असलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुण कलाकार दिल्ली मेट्रोच्या आत गिटार वाजवताना भगवान रामाचे सुंदर भजन गात आहे, तर दुसरा मुलगा गिटार वाजवत असलेला दिसत आहे. मेट्रोमध्ये प्रवास करणारे इतर प्रवासीही गाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यूजर्स हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. (हेही वाचा: Ram Aayenge Song Video: अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)