Father’s Day 2022: मुलीसाठी वडील म्हणजे जीव की प्राण असतो. जगभरात दरवर्षी जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी पितृदिनाच्या निमित्ताने मुलं आपल्या वडिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देतात. सध्या सोशल मीडियावर एका एलपीजी-गॅस तंत्रज्ञाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या तंज्ञाच्या खिशाला Badge दिसत आहे. हा बॅज त्याला आपल्या 8 वर्षांच्या मुलीने फादर्स डे निमित्ताने दिला आहे. हा क्यूट बॅज घालून ही व्यक्ती गॅस पाईपमधील गळती दूर करण्यासाठी गेली.

एका प्रसिद्ध ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट या व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "एलपीजी-गॅस तंत्रज्ञ नुकताच एक गळती पाईप दुरुस्त करण्यासाठी आला होता. त्याच्या 8 वर्षांच्या मुलीने बॅज बनवला. तो त्यांनी दिवसभर घातला."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)