Video: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका चालत्या कारला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सेक्टर-15A च्या फेज-1 मधील पोलीस स्टेशन परिसरात घडली, जिथे XUV-500 कारमध्ये आधी स्फोट झाला, नंतर कारमध्ये भीषण आग लागली. कारमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण होते, तिघांनीही जीव वाचवण्यासाठी पटापट गाडीच्या बाहेर उड्या मारल्या.

पाहा व्हिडीओ: 

नोएडा येथील ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर वाहनाला आग लागल्याचा व्हिडीओ नागरिकांना सतर्क करण्यासाठी शेअर केला आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)