Maria Branyas Morera Dies: जगातील सर्वात वयोवृद्ध मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत जन्मलेल्या स्पॅनिश मारिया ब्रान्यास यांचे वयाच्या 117 व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ब्रान्यास यांच्या 'एक्स' अकाऊंटवर त्यांच्या कुटुंबीयांनी लिहिले की, मारिया ब्रान्यास आपल्या सर्वांना सोडून गेली आहे. तिला ज्या मार्गाने जायचे होते त्या मार्गाने ती गेली: पूर्णपणे शांत, गाढ झोपेत आणि कोणत्याही वेदनाशिवाय.
मारिया यांचे निधन झाले तेव्हा, त्यांचे वय 117 वर्षे आणि 168 दिवस होते. त्या इतिहासातील आठव्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तीदेखील (पडताळणीयोग्य वयासह) होत्या. अहवालानुसार, मारिया यांनी स्पेनमधील कॅटालोनिया येथील नर्सिंग होममध्ये अखेरचा श्वास घेतला, जिथे त्या गेली दोन दशके राहत होत्या. मारिया यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे झाला होता. मारिया आठ वर्षांचा असताना आपल्या कुटुंबासोबत त्या सॅन फ्रान्सिस्को वरून स्पेनमध्ये परतल्या. अटलांटिक प्रवासादरम्यान, त्यांनी एका कानाने ऐकण्याची शक्ती गमावली आणि क्षयरोगामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 118 वर्षीय फ्रेंच महिला लुसील रँडन यांच्या मृत्यूनंतर जानेवारी 2023 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने, मारिया यांना सर्वात वयस्कर जिवंत व्यक्तीचा किताब दिला होता. (हेही वाचा: World's Oldest Man Death: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Jose Paulino Gomes यांचे निधन; वयाच्या 127 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मारिया ब्रान्यास मोरेरा यांचे वयाच्या 117 व्या वर्षी निधन-
Guinness World Records is saddened to learn of the passing of the world’s oldest person, Maria Branyas Morera https://t.co/aWCqrp8pg6
— Guinness World Records (@GWR) August 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)