Spider Mite Found Inside Cold Drink Bottle: अन्नपदार्थांमध्ये आढळलेल्या असामान्य वस्तूंच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान, आता कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील एका ग्राहकाला सीलबंद कोल्ड ड्रिंकच्या बाटली (Cold Drink Bottle) मध्ये कोळी (Spider Mite) सापडला आहे. उपलब्ध व्हिडिओनुसार, हिरव्या कोल्ड्रिंकच्या बाटलीत जिवंत कोळी आढळून आला. यापूर्वी आइस्क्रीममध्ये मानवी बोट, हर्शीच्या चॉकलेट सिरपच्या बाटलीत मृत उंदीर, अहमदाबादमध्ये सांबारच्या भांड्यात मृत उंदीर सापडल्यानंतर आता हे प्रकरण समोर आले आहे. तत्पूर्वी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका अंगणवाडीत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वितरित केलेल्या पाकिटात मेलेला साप आढळून आला होता. (हेही वाचा - Ahmedabad Shocker: अहमदाबादच्या देवी डोसा पॅलेसमध्ये सांबरमध्ये आढळला मृत उंदीर, अन्न विभागाने रेस्टॉरंट केले सील - VIDEO)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)