Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल (Viral Video( होत आहे. या व्हिडिओमध्ये एक काळा कुत्रा बांधकामाधीन इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून जमिनीवर चालताना दिसत आहे. खाली उतरल्यानंतर तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. कारण, एवढ्या उंचावरून उडी मारूनही तो अगदी सहजपणे खाली चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कुत्रा पाचव्या मजल्यावरून एका बांधकामाखालील इमारतीच्या काठावर उभा होता. काही सेकंदांनंतर, तो साहसी आणि रोमांचकारी कामगिरी करत खाली उतरतो. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स अवाक झाले असून या कुत्र्याची प्रशंसा करत आहेत.
Jumps from 5th floor & continues walking normally... How is this possible? pic.twitter.com/uGEEnRkr5g
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) October 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)