तुमच्या इंटरनेट वापरावर न्यायालयाचा आदेश आहे असा धक्कादायक ईमेल तुम्हाला मिळाला आहे का? जर असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. सरकारने या घटना स्कॅम असल्याचं सांगितलं आहे.तसेच सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत PIB फॅक्ट चेक च्या X अकाऊंट वर, हा अलर्ट पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये यूजर्सना भारतीय गुप्तचर विभागाकडून येणाऱ्या बनावट ईमेलबद्दल इशारा देण्यात आला होता. PIB फॅक्ट चेकनुसार, हा फिशिंग स्कॅम असू शकतो. हा ईमेल मिळणर्यांना अनुचित ऑनलाइन अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असल्याचा खोटा आरोप केला जात आहे आणि कायदेशीर कारवाईची धमकी देखील देण्यात आली आहे.
पीआयबी फॅक्ट चेक पोस्ट
Received an e-mail informing you of a court order against your internet traffic❓
⚠️Beware ‼️ This could be a phishing scam targeting you.#PIBFactCheck
❌This email is #FAKE
✔️Report any suspicious emails on the official cyber-crime portal: https://t.co/3ROioPMaaZ pic.twitter.com/QX6AFmWQXF
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)