सापाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला सापासोबत मस्ती करताना साप चावला आहे. साप चावणं ही भीतीदायक असली तरी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल. या व्हिडीओमध्ये हा तरुण सापाशी जुगलबंदी करत होता. यादरम्यान सापाने त्या व्यक्तीला अशा ठिकाणी दंश केला जो तो कोणालाही सांगू शकत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सापाची शेपटी पकडून त्याच्यासोबत युक्त्या करत आहे.

या दरम्यान साप खूप आक्रमक दिसतो. व्हिडिओच्या पहिल्या फ्रेममध्येच साप त्या व्यक्तीच्या अंगावर येताना दिसत आहे. मात्र, ती व्यक्ती सापाच्या पहिल्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवते. यानंतर, तो पुन्हा एकदा सापाची शेपटी पकडून युक्त्या करू लागतो. साप आजूबाजूला उडी मारतो आणि व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला चावतो. हे पाहून तिथे उपस्थित लोक हसू लागले. तो माणूस जोरात ओरडायला लागतो. तो कसा तरी सापापासून मुक्त होतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)