Dog Attack in UP: उत्तर प्रदेशातील अमरोहा भागात शनिवारी, 9 मार्च 2024 रोजी एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच कुत्रे मुलीचा पाठलाग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चार ते पाच भटके कुत्रे मुलीवर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत मुलीचा जीव वाचवला. शहराच्या नगर कोतवाली परिसरात कुत्र्यांची दहशत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अनेकवेळा या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केला आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)