सोशल मीडियावर एक निवेदन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका योजनेमध्ये अर्जदारांच्या खात्यात सरकार 30 लाख रुपये जमा करणार असल्याचा दावा या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. मात्र यासाठी अर्जदाराला 10,100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे, असेही यात नमूद केले आहे. हे निवेदन भारत सरकारकडून जारी केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर, सरकारने हे पत्र आणि त्यात नमूद केलेली योजना फेटाळून लावली असून ते बनावट पत्र असल्याचे म्हटले आहे.
अशी कोणतीही योजना आपल्या बाजूने चालवली जात नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून (ऑनलाइन फसवणूक) सावध रहा आणि अर्जाच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. या व्हायरल पत्राची सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) चौकशी केली आहे. पीआयबीने म्हटले आहे की, भारत सरकारच्या नावाने एक पत्र सोशल मीडियावर फिरत आहे ज्यामध्ये लाभार्थीला 30 लाख रुपये देण्याबद्दल भाष्य केले आहे. फसवणूक करणारे हे लोक सरकारी संस्थांच्या नावाने फसवणूक करत आहेत. अशा कोणत्याही पत्राबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे पत्र बनावट असल्याचे सांगत सरकारने अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
A #Fake letter issued in the name of Govt of India claims that the recipient's account will be debited with Rs 30 Lakhs on payment of Rs 10,100.#PIBFactCheck
▶️Fraudsters impersonate Govt organisations to dupe people of money.
▶️Beware of such fraudulent letters. pic.twitter.com/01ON2Z3cKI
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)