केंद्र सरकारच्या अनेक योजनांबद्दल सोशल मिडियावर विविध दावे केले जातात. यातील काही खरे असतात तर बरेच खोटे. आताही 'कन्या सुमंगला योजने’बद्दल असाच एक दावा केला आहे. 'सरकारी व्लॉग' नावाच्या YouTube चॅनेलच्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, 'कन्या सुमंगला योजने' अंतर्गत ज्यांच्या कुटुंबात मुली आहेत त्यांना केंद्र सरकार दरमहा 4,500 रुपये देत आहे. या दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आता पीआयबीने या दाव्याची तपासणी केली असता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
'Sarkari Vlog' नामक यूट्यूब चैनल के एक वीडियो में दावा किया गया है कि जिनके परिवार में बेटियां हैं उन्हें 'कन्या सुमंगला योजना' के तहत केंद्र सरकार हर महीने ₹4,500 दे रही है #PIBFactCheck
➡️ यह दावा फर्जी है
➡️ केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है | pic.twitter.com/D724QS7byI
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)