Elderly Man Smoking Bidi In Delhi Metro: एका व्हायरल व्हिडिओमुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी प्रवास करताना मेट्रो ट्रेनमध्ये एक माणूस 'बिडी' पेटवताना दिसतो. घटनेची नेमकी तारीख आणि ठिकाण मात्र अज्ञात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, वृद्ध व्यक्ती खिशातून बिडी काढत आहे आणि प्रवाशांनी भरलेल्या मेट्रोमध्ये ती पेटवताना दिसत आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी बिडी पेटवल्याबद्दल इतर काही प्रवाशांनी त्याला आक्षेप घेतल्याचे दिसून येते. त्या व्यक्तीने कथितरित्या उत्तर दिले की त्याच्याकडे तिकीट आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शेकडो वापरकर्त्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्‍यांकडून उत्तर मागितले आहे. तथापि, डीएमआरसी आणि इतर अधिकार्‍यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. (हेही वाचा - Delhi Metro Couple Kissing Video: दिल्ली मेट्रोमध्ये कपलचा किसिंग व्हिडिओ व्हायरल, नेटिझन्सने दिल्या संतप्त प्रतिक्रिया, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)