नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हण्टल की ते मद्याविना अपुर्णचं असा अनेकांचा समज आहे. किंबहुना या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्य खरेदी केल्या जाते. शहरात, खेड्यात, युवक, जेष्ठांपर्य नव्या वर्षाच्या सिलिब्रेशनमध्ये मद्य प्राशन करुन नव्या वर्षाचं स्वागत करतात. असेच काही तरुण न्यू इयर इव्हला मद्य खरेदीसाठी गेले असता ते चक्क दुध पिऊन आलेत. ऐकायला जरा विचित्र वाटत पण हे खरं आहे. दारू खरेदीसाठी वाईन शॉपमध्ये गेले असता तेथे काही लोक आले. प्रत्येकाच्या हातात एक मोठा ट्रे होता आणि त्यात दुधाचे ग्लास. दारू विकत घेण्यासाठी आलेल्या लोकांना मोफत दुधाच्या ग्लासचे वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)