Punjab Parking Lot Collapsed Video: पंजाबमधील मोहाली येथील एका इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. बेकायदेशीरपणे बांधकाम करवून घेणाऱ्या इमारतीच्या मालकावर या घटनेचा ठपका ठेवण्यात येत आहे. या घटनेत तपासाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे. वृत्तानुसार, बुधवारी दुपारी मोहालीच्या सेक्टर-83 मध्ये असलेल्या आयटी सिटीच्या प्लॉटमध्ये तळघर खोदण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक शेजारील इमारतीचा पार्किंगचा भाग सुमारे 20 फूट खाली कोसळला, त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार आणि काही दुचाकी खाली जमिनीसह गाडल्या गेल्या. (हेही वाचा - Biparjoy Cyclone Video: बिपरजॉय वादळ अवकाशातून कसं दिसतं? पहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)