Viral Dance Video: मेट्रो ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि इतर विविध सार्वजनिक ठिकाणी लोक डान्स (Dance) करण्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. परंतु, यामुळे संभाव्य धोके देखील होऊ शकतात. इंटरनेटवर फिरत असलेला एक व्हिडिओ हा ट्रेंड हायलाइट करतो, ज्यामध्ये एक तरुणी मुंबईतील गर्दीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर 'कुछ कुछ होता है' मधील 'कोई मिल गया' गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. सीमा कनोजिया असे या महिलेचे नाव असून, 4.8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली इंस्टाग्राम ब्लॉगर आहे. निळ्या रंगाचा टॉप आणि काळी पँट घातलेली कनोजिया जमिनीवर लोळताना आणि विविध डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. (हेही वाचा - Sings Sundar Te Dhyan Song: Janhvi Harrison ने स्टॅनफोर्ड मेमोरियल चर्चमध्ये गायल 'सुंदर ते ध्यान' भक्तीगीत, पहा व्हायरल व्हिडिओ))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)