Versova Fishermen Search Operation Video: वर्सोवा गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर तीन जणांना घेऊन जाणारी मासेमारी बोट उलटली. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एकाला वाचवण्यात यश आलं असून इतर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. सध्या या दोघांचा शोध सुरू आहे. बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे. समूद्रकिनाऱ्यालगत एक हॅलिकॉप्टर शोध मोहिम राबवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)