Water Seepage In Coastal Road Tunnel: मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती लागली असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता याबाबत उपाययोजना केल्याचे बीएमसीने सांगितले आहे. बीएमसीने माहिती दिली की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत आहे. तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक 31 मे 2024) पाहणी केली. सर्व दुरुस्तीच्या कामांची त्यांनी स्वत: खात्री केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडवर सुरू झालेल्या पाणी गळतीच्या घटनेची दखल घेत भेट देऊन पाहणी केली होती व गळती तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. (हेही वाचा: Mumbai: पावसाळ्यात झाडे पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे इ. समस्यांसाठी मिळणार त्वरीत मदत; MMRDA ने स्थापन केला नियंत्रण कक्ष, जाणून घ्या संपर्क क्रमांक)
पहा व्हिडिओ-
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत आहे. तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक ३१ मे २०२४) पाहणी केली. सर्व… pic.twitter.com/VLePXeEz4N
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)