Senior Journalist Satish Nandgaonkar Passes Away: ज्येष्ठ पत्रकार सतीश नांदगावकर यांचे बुधवारी निधन झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. सतीश हे ठाणे, नवी मुंबई विभागातील हिंदुस्तान टाईम्सचे ब्युरो प्रमुख म्हणून कार्यरत होते. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास ठाण्यातील बाळकुम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत काम करत होते. मुंबई मिरर, द टेलिग्राफ, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्स्प्रेस आणि द इंडिपेंडंटसह विविध प्रकाशनांमध्ये योगदान दिले. त्यांनी असोसिएटेड प्रेस आणि क्षैतिज पोर्टल, Indya.com सह स्ट्रिंगर म्हणून काही काळ काम केले. सतीश यांच्या मृत्यूनंतर पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Satish Nandgaonkar (@NewsroomMumbai), a veteran journalist, was lost to cardiac arrest today.
Satish sir was my rock, my safe space, my go-to person for everything.
We'd spend hours texting each other everything under the sun, from the silliest of jokes to the most melodious… pic.twitter.com/QgxmBWewq0
— Gautam S. Mengle (@NotMengele) February 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)