प्रख्यात ट्रेड युनियन नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या हाय-प्रोफाइल हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला गुंड राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याची शुक्रवारी विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुंबईत 1997 मध्ये डॉ. दत्ता सामंत यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता विशेष सीबीआय न्यायाधीश एएम पाटील यांनी राजनची या हाय-प्रोफाइल खून खटल्याशी संबंधित सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. सामंत हे पवईवरून घाटकोपर येथील पंतनगर येथे जीपने जात असताना पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी डॉ. सामंत यांचे वाहन अडवले आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी या कामगार संघटनेच्या नेत्यावर किमान सतरा गोळ्या झाडल्या. डॉ. सामंत यांना तातडीने जवळच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणात राजनला ऑक्टोबर 2015 मध्ये बाली, इंडोनेशिया येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची जबाबदारी घेतली आणि डॉ. सामंत यांच्या हत्येप्रकरणी खटला चालवला. आता या प्रकरणात राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. (हेही वाचा: Offensive Remarks Against Savitribai Phule: सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणं ट्विटर यूजर्संना भोवणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश)
#CBI court on Friday acquitted #gangster #ChhotaRajan in a case related to the 1997 murder of trade union leader #DattaSamant for want of #evidence https://t.co/HURDGu5v16
— Economic Times (@EconomicTimes) July 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)