उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी काल शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. सध्या महेश गायकवाड रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.  उल्हासनगरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.  (हेही वाचा - MLA Ganpat Gaikwad Statement On Thane Shootout: भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले 'होय, मी गोळीबार केला', कारणही सांगितले, घ्या जाणून)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)