पुण्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरी मध्ये 30 डिसेंबरला होणार्या सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी संख्या पाहता आता ट्राफिक विभागाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये सातारा, लोणंद, फलटण, बारामती येथून पुण्यात येणारी जेजुरी सासवड मार्गे वाहतूक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. दरम्यान हा वाहतूकीमधील बदल 30 डिसेंबरला सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
खंडोबाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीमध्ये बदल
#पुरंदर तालुक्यातील #जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री #खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश जारी. pic.twitter.com/YDQZjQqKCm
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)