एमपीएससी 2020 पूर्व परीक्षेची (MPSC 2020 Prelims) तारीख आज अखेर जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षभरात ही परीक्षा अनेकदा रद्द करण्यात आली होती. काल पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत निर्दशने केली. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी परीक्षा वेळेत घेण्याची मागणी उचलून धरली. या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आणि परीक्षा आठ दिवसांतच होईल, असे वचन दिले. तसंच आज परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)