Burning Bus Video: परळी शहरात प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसने अचनाक पेट घेतली आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून प्रवाशी बस परळी मार्गे परभणी जिल्ह्यात निघाली होती. एसटी बस महामंडळाची बस वातानुकूलीत होती. पेट घेतलेल्या बस मधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. वेळीच सावध राहून मोठी जीवितहानी टाळली आहे. यामध्ये एकूण २० प्रवाशी प्रवास करत होते. मीडिया रिपोर्टनुसार, या बसचा टायर फुटल्याने आणि वायरचे स्पार्किंग झाल्याने ही घटना घडली. शुक्रवारच्या छत्रपती शिवाजी चौकात ही घटना रात्रीच्या नऊच्या सुमारास घडली. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु होते. घटनेची माहिती महापालिका अग्निशमन दलाला देण्यात आली. तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. काही तासांने आग नियंत्रणात आणली. बस ही परभरणी आगारची होती. बस या घटनेत संपुर्ण जळाली आहे.
परळीत धावत्या बसने घेतला पेट, प्रवाशांची पळापळ#stbuc #msrtc #beed pic.twitter.com/3N7Ga8WYX0
— Hindustan Times Marathi (@htmarathi) October 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)