Parbhani Riot: परभणीत संविधान (Constitution) पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याप्रकणी आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, बंदच्या हाकेला हिंसक वळून लागलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक केली. काही इतर गाड्यांची मोडतोडही केली. बंद दुकानांवर दगडफेक केली. या आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. सध्या शहरांमध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (हेही वाचा:Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती)
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबणेच्या प्रकरणात शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून दिल्या. पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालं.
आंदोलकांची पोलिसांच्या गाडींवर दगडफेक
Parbhani, Maharashtra: The public pelted stones at a police van, forcing the police personnel to flee with the van to save their lives pic.twitter.com/Le7BV61zuz
— IANS (@ians_india) December 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)