Sane Guruji Death Anniversary 2022: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी यांची आज पुण्यतिथी राज्यभरात साजरी होत आहे. या निमित्ताने राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या स्मृतिस आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिवादन केलं आहे.
महान समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक व प्रतिभावंत लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/YcP2TPP0XH
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 11, 2022
प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधुत्वाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. समाजातील जातीभेद दूर होऊन समता व बंधुभाव वाढण्यासाठी पुढाकार घेणारे महान स्वातंत्र्यसेनानी, आदर्श शिक्षक व साहित्यिक साने गुरुजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/OElR1nREK4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 11, 2022
"खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..."
अवघ्या जगाला प्रेमाची व मानवतेची शिकवण देणारे मातृहृदयी साहित्यिक, थोर समाजसुधारक साने गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!#SaneGuruji #साने_गुरुजी pic.twitter.com/ej8hQYZ5mk
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 11, 2022
राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक व साहित्यिक साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/u3BNRw9r2g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 11, 2022
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.
#SaneGuruji pic.twitter.com/bLRpVWEkLK
— Ameet Satam (@AmeetSatam) June 11, 2022
"हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून,
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो!"
अशा शब्दांत देशवासीयांना साद घालत बलसागर भारताचे स्वप्न पाहणारे, समाजाला मानवतेची शिकवण देणारे थोर समाजसुधारक, गांधीवादी शिक्षक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!#SaneGuruji pic.twitter.com/Fow3wQ5c7J
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) June 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)